आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे.

आरोग्यासाठी (फिजिकल हेल्थ) ज्याप्रमाणे चांगल्या अन्नाची, व्यायामाची गरज असते, मानसिक स्वास्थ्यासाठी (मेंटल हेल्थ) मेडिटेशनची (योगा आणि ध्यान) गरज असते, त्याचप्रमाणे आर्थिक स्वास्थ्य (वेल्थ) साठी आर्थिक साक्षरता महत्त्वाची असते.

आर्थिक साक्षरता म्हणजे आलेले पैसे आपण कसे खर्च करतो (spending habbit), वाचवतो (saving habbit) आणि गुंतवतो (investment habbit) याची चांगली जान असणे आणि त्याचे नियोजन करणे.

बऱ्याचश्या लोकांच्या मते गुंतवणूक (इन्वेस्टमेंट) धोकादायक (risky) आहे, हे जरी खरे असते तरी ते आर्थिक दृष्ट्या निरक्षर असलेल्यांसाठी. याचाच अर्थ असा निघतो की गुंतवणुकीपेक्षा आर्थिक निरक्षरता ही जास्त धोकादायक (risky) आहे, म्हणून प्रत्येकाने आर्थिक दृष्ट्या साक्षर होणे महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे आणि काळाची गरजही.

नवे गुंतवणूकदार असो वा जुने, सर्वोत्कृष्ट गुंतवणुकीबाबत लोक नेहमीच गोंधळतात.कारण प्रत्येक गुंतवणूक पर्यायात वेगळे धोक व परतावे असतात. म्हणूनच, विविधता हा गुंतवणुकीतील महत्त्वाचा घटक ठरतो.

तरुण प्रोफेशनल्सनी अगदी करियरच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही पदवीधर झाला असाल आणि करिअरची सुरुवात केली असेल तर बचत करण्याची योग्य वेळ हीच आहे.

शेअर बाजार पाहून किंवा वाचून लक्षात येऊ शकत नाही, तर त्याचे गमक हे गुंतवणूक करूनच कळू शकते. अगदी छोटय़ा रकमेपासूनही गुंतवणूक करता येते. तरुण वयातच गुंतवणुकीची शिस्त लावून घेणे सुरक्षित भविष्यासाठी गरजेचे आहे.

अधिक तपशीलासाठी संपर्क साधा +91 92247 56311

Photo by maitree rimthong on Pexels.com

Leave a comment