‘स्टॉक मार्केट रिसर्च’ म्हणजे नक्की काय असतं?

कल्पना करा की आपण नवीन फोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमची निवड प्रक्रिया काय असेल?

किंमत, ब्रँड् आणि विविध तांत्रिक वैशिष्ट्यांची तुलना करून आपल्यासाठी कोणते घटक महत्वाचे आहेत यावर निर्णय अवलंबून असेल.

  • किंमत श्रेणी निश्चित करणे (decide on Price range)
  • ब्रँड्सचा एक संच शॉर्ट लिस्ट करणे (short list a set of brands)
  • विविध तांत्रिक वैशिष्ट्यांची तुलना (technical specifications) करणे; बॅटरी-लाइफ असो किंवा कॅमेरा मेगापिक्सेल

ही प्रक्रिया Stock Market Research सारखीच आहे. Stock market research साठी डेटा (Data) आणि माहिती (Information) आवश्यक आहे. गुंतवणुकीशी संबंधित माहितीचे मूल्यमापन करणे हेही तितकेच महत्वाचे. यात macro आणि micro-economics (अर्थशास्त्र), सूक्ष्म आर्थिक घटक (micro economic factors), उद्योग-विशिष्ट माहिती (industry-specific information) आणि कंपनी-विशिष्ट माहिती (company-specific information) बद्दल माहिती समाविष्ट असते. आर्थिक आकडेवारी संदर्भातील माहिती सरकारी आणि मध्यवर्ती बँकेने (RBI) पुरविलेल्या आकडेवारीवरून संकलित केली जाऊ शकते.

जागतिक घटकांची माहिती आंतरराष्ट्रीय संस्थांकडून गोळा केली जाऊ शकते जसे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), आशियाई विकास बँक (IDB), जागतिक बँक (World Bank) आणि इतर जागतिक
विकास वित्तीय संस्था. उद्योग/क्षेत्रांची माहिती गोळा करण्यासाठी उद्योग-विशिष्ट नियतकालिके आणि प्रकाशने वापरली जाऊ शकतात. कंपनी-विशिष्ट माहिती (Company-specific information) विविध मार्गांनी गोळा केली जाऊ शकते.

  • Financial statements
  • Annual reports
  • Meeting officials of the company authorized
  • Plant/factory visits
  • Market surveys
  • Employee/stakeholder interviews

विश्लेषण (analysis) आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया (decision making process) म्हणजे परिणाम करणारे गुणात्मक घटक (qualitative factors) समजून (understanding) घेणे. जसे की, ऑपरेशनल कामगिरी, ऑपरेशनची कार्यक्षमता (operational capacity and efficiency), स्पर्धात्मकता (competitiveness), व्यवसाय योजना (business plan) आणि कार्य व्यवस्थापनाची नैतिकता (Work ethics management) आणि महसूल (revenue), खर्च (cost / expenses), नफा (profit) यासारखे परिमाणात्मक घटक (quantitative factors) आणि आर्थिक धोका (financial risk).

Leave a comment