SEBI कडून naked short selling वर ban

शेअर बाजारातील चढउतार टाळण्यासाठी SEBI ने शॉर्ट सेलिंगचे नियम बदलले आहेत. आता संस्थात्मक गुंतवणूकदारांना ऑर्डर देताना हे जाहीर करावे लागेल की प्रस्तावित व्यवहार (trade) ‘शॉर्ट सेलिंग’ आहे की नाही.

याशिवाय किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना शेअर्सची ‘शॉर्ट सेलिंग’ करण्याची परवानगी आहे, पण आता किरकोळ गुंतवणूकदारांना व्यवहाराच्या दिवशी ट्रेडिंग (intraday)कालावधी संपेपर्यंत विक्रीची माहिती द्यावी लागेल.

काय बदलले?

SEBI ने सांगितले की, संस्थात्मक गुंतवणूकदारांना ऑर्डर देताना सांगावे लागेल की प्रस्तावित व्यवहार ‘शॉर्ट सेलिंग’ आहे की नाही. शॉर्ट सेलिंग म्हणजे डीलच्या वेळी विक्रेत्याच्या मालकीचे नसलेले शेअर्स विकणे.

गेल्या काही महिन्यांत, शेअर बाजारात शॉर्ट सेलिंगचा वाढता कल आणि त्यानंतर होणार्‍या चढउतारांबाबत चिंता निर्माण झाली आहे. हे लक्षात घेऊन, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने बाजारात शॉर्ट सेलिंगशी संबंधित नियमांबाबत काही बदल केले आहेत.

Leave a comment