SIP गुंतवणूक का आहे गरजेची? 

SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान. गुंतवणूकदाराला एक निश्चित रक्कम नियमितपणे म्युच्युअल फंड प्लानमध्ये किंवा थेट स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देतो. 

सध्या बाजारात अनेक प्लान्स येत आहेत जिथे तुम्ही गुंतवणूक करून ना केवळ पैसे वाचवू शकता तर बचतीची रक्कम वाढवू शकता. यातच सगळ्यात जास्त गरजेचे आहे तुम्ही योग्य Hठिकाणी पैशाची गुंतवणूक करणे गरजेचे असते ज्यामुळे बचतीची रक्कम वाढू शकेल. सध्या म्युच्युअल फंडमधी(mutual fund) किंवा थेट स्टॉक मध्ये एसआयपी (सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान)(systematic investment plan)च्या माध्यमातून लोक मोठ्या गुंतवणूक(investment) करत आहेत. जर तुम्हालाही तुमच्या बचतीची रक्कम वाढवायची असेल तर एसआयपीमध्ये जरूर गुंतवणूक करा. तसेच भविष्य सुरक्षित करण्यासाठी एसआयपी हा चांगला पर्याय आहे. याशिवाय तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा सोपा मार्ग देखील आहे. एसआयपी प्लानमध्ये दीर्घकाळासाठी कमी गुंतवणूक करून अधिक बचत करू शकता. यासोबत नियमित गुंतवणुकीने तुम्ही शिकू शकता की पैसे कुठे आणि कधी गुंतवले पाहिजेत.

एसआयपी म्हणजेच सिस्टमॅटित इन्वेस्टमेंट प्लान तुमच्या खरेदीप्रमाणे अधिकाधिक रिटर्न्स मिळवून देण्यात मदत करतो. जेव्हा तुम्ही बाजारातील स्थितीची पर्वा न करता नियमितपणे गुंतवणूक करत असाल तर मार्केट कोसळल्यानंतरही तुम्हाला अधिक युनिट मिळतात. मात्र जेव्हा मार्केट वर जाते तेव्हा कमी युनिट मिळतात. 
जेव्हा तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करता आणि गुंतवणुकीवर रिर्टन्स मिळवण्यास सुरूवात करता तेव्हा तुम्हाला तुमचा पैसा मिळण्यास सुरूवात होते.

  1. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा – रुपयाच्या किंमतीचा लाभ उचचलून एसआयपी अस्थिर बाजारात चांगले काम करते. शॉट टर्ममध्ये गुंतवणूकीचा फायदा होत नाही. एसआयपीमधून बाहेर निघाल्यास चांगले रिटर्न मिळत नाही. त्यामुळे नेहमी एसआयपी प्लानसाठी दीर्घकाळाची गुंतवणूक गरजेची असते. यासाठी कमीत कमी १० ते १५ वर्षांचा कालावधी असावा. 
  2. विविधता – कधीही एका म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू नका. यापेक्षा वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा. यामुळे तुम्हालाच फायदा होईल. जर एका सेक्टर चांगला परफॉर्म करत नसेल तर तुम्ही दुसऱ्या सेक्टरवर विश्वास ठेवू शकता. त्यामुळे कधीही एकाच ठिकाणी पैसे गुंतवू नका.
  3. मंदी असताना बाहेर पडू नका – जर तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात तर मार्केट जेव्हा वर गेलेले असते तेव्हा बाहेर पडणे चांगले आहे. एसआयपी थांबवण्याआधी योग्य वेळेची वाट पाहा. जर तुम्ही मार्केटमध्ये मंदी असताना एसआयपीमधील गुंतवणूक बंद करत असाल तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळणार नाहीत. 
  4. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने फंड निवडा – जेव्हा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकीचा विचार करता तेव्हा तो दीर्घकाळ गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. यासाठी तुम्हालाही फंडही असा निवडावा लागेल ज्यात तुम्ही दीर्घकाळासाठी पैसे गुंतवणूक कराल आणि त्यानंतर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. यासाठी अभ्यास करणे गरजेचे असते. ज्या म्युच्युअल फंडने गेल्या चार ते पाच वर्षात काय कामगिरी केली आहे ते पाहूनच फंड निवडा. केवळ वर्षभरातील म्युच्युअल फंडची कामगिरी पाहून फंडची निवड करू नका.
  5. फंड चांगली कामगिरी करत आहे हे चित्र स्पष्ट होईल. तसेच रिव्ह्यू केल्यास हे ही स्पष्ट होईल की जर एखादा फंड सातत्याने घसरत असेल तर त्यातून बाहेर पडून काही काळासाठी दुसऱ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. 
Photo by Nataliya Vaitkevich on Pexels.com

Leave a comment